आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : संततिसौख्य लाभेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कर्क : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.

सिंह : जिद्दीने कार्यरत रहाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कन्या : व्यवसायात वाढ होईल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

तूळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक लाभ होतील.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मनोबल कमी राहील.

धनू : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

मकर : नवीन परिचय होतील. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कुंभ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.

Leave a Comment