पक्षविरोधी कारवाई केल्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित करण्याचा ठराव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बैठक बोलावली होती.
राष्ट्रीय कार्यकरणीच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत 8 ठराव करण्यात आले.
अजित पवारांसोबत शपथ घेतलेल्या 9 आमदारांवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अपात्रतेची कारवाई केली होती. त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय राष्ट्रीय कार्यकरणीत झाल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
शरद पवार हेच राष्ट्रवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यय असल्याचा ठराव यावेळी करण्यात आला. 2 खासदार आणि 9 आमदारांचे निलंबन करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. जे काही निर्णय आम्ही घेतले आहेत त्यामुळे आमची हिंम्मत वाढली असल्याचे यावेळी शरद पवार यांनी सांगितले.
