राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणाऱ्या भाजपला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या भाजपच्या चार माजी नगरसेवकांसह व्यापारी आघाडीच्या पदाधिकाऱ्याने पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
सोबतच माजी नगरसेवक संतोष भोसले, राजश्री चव्हाण आणि जुगनबाई आंबेवाले यांनी देखील आपल्यासोबत राजीनामा दिल्याची माहिती स्वतः नागेश वल्याळ यांनी दिली.
