भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी त्यांचे बंधू धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचं औक्षण केलं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा यांनी धनंजय मुंडे यांना शुभेच्छा दिल्या.
पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंनी औक्षण करतानाचा एक व्हिडीओ ट्विट केलाय.
धनंजय मुंडेंनी म्हणतात, “राज्याच्या मंत्री पदी नियुक्तीनंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ताईनं माझं औक्षण केलं व शुभेच्छा दिल्या.
भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे”, अशा भावना धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्यात.
