Delhi – काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोठा झटका बसला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने (Gujarat High Court) राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आहे.
मोदी आडनावाशी संदर्भात केलेल्या विधानाप्रकरणी सुनावलेल्या शिक्षासंदर्भात आज (7 जुलै ) राहुल गांधींच्या याचिकेवर सुनावणी पार पडली.
यावेळी उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. न्यायालयाच्या निर्णयमुळे राहुल गांधींची खासदारकी रद्दच राहणार आहे. राहुल गांधीसांठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
