संगमनेर : बिरेवाडीवर शोककळा ; अर्जुन भोसले यांच निधन

संगमनेर(DSNews24) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील अर्जुन तुकाराम भोसले यांचं वार सोमवार दि. १० जुलै रोजी सकाळी ९.१५ वा. दुःखद निधन झाले आहे.

त्यांचं मृत्यूसमयी ५५ वय होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तसेच ते युवा नेते गुलाबराजे भोसले यांचे चुलते होते. त्यांच्या पश्चात पत्नी अलका, मुलगा अशोक असा छोटासा परिवार आहे.

अर्जुन भोसले यांच्यावर आज दुपारी २ वाजता बिरेवाडी गावठाण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने बिरेवाडीवर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment