शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे- नगर महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोवर एक कार आदळून टेम्पो समोरील दोन दुचाकींवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली असताना सुदैवाने कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
सणसवाडी येथील मुख्य चौकात रस्त्याच्या कडेला हा टेम्पो उभा असताना अचानक पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने ही कार भरधाव वेगाने आली.
दरम्यान, कार चालकाचा कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोवर जोरात आदळली. यावेळी टेम्पो काही पुढे जाऊन टेम्पो पुढे रस्त्याचे कडेला उभ्या असलेल्या या दोन दुचाकींवर आदळला.
यावेळी कारमध्ये एका दाम्पत्यांसह एक लहान मुलगी होती मात्र सुदैवाने ते सार्वजन बचावले. मात्र, कारसह टेम्पो व दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले तर एका दुचाकीची दोन्ही चाके तुटून बाजूला पडली.
यावेळी रस्त्याचे कडेला वाहनांच्या रांगा लागत मोठी गर्दी झाली होती. पोलीस नाईक अतुल पखाले व आदींनी याठिकाणी धाव घेत वाहतूक कोंडी सुरळीत केली. मात्र यावेळी कोणालाही इजा झाली नसून कारचालक किरकोळ जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पखाले हे करीत आहेत.
