साकूर वार्ताहर : विकसित भारत, गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाका, आपल्या वारशाचा अभिमान बाळगा, एकतेचे सामर्थ्य, नागरिकांची कर्तव्य ही अमृतकाळाची पंचप्रण युवा संवादाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक रोहिदास भडकवाड यांनी केले.
ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ आणि रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय साकुर आयोजित जी 20 जनभागीदारी पंचप्रण-युवा संवाद अभियान राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थी विकास अधिकारी नियोजन कार्यशाळेत ते बोलत होते.
रमेश फिरोदिया महाविद्यालयात मंगळवार दि. 11 जुलै 2023 रोजी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळेस व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. सचिन घोलप, विद्यार्थी विकास मंडळाचे विभागीय समन्वयक रणजीत गिरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक म्हतू खेमनर उपस्थित होते.
या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक रोहीदास भडकवाड म्हणाले की, आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आहवानानुसार संपूर्ण देशभर जी 20 भागीदारी पंचप्रण -युवा संवाद अभियान राबवायचे आहे, त्यासाठी पंतप्रधान महोदयांनी युवा संवाद साधण्यासाठी पंचप्रण दिलेली आहेत, ती आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगून युवा संवाद दूत तयार करून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून हे अभियान आपण सर्वजण यशस्वी करू.
महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. सचिन घोलप म्हणाले की, 1 डिसेंबर २०२२ पासून भारताकडे जी 20 अध्यक्षपद आहे. भारताला अध्यक्षपद मिळणे ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालेली आहे आपण सर्वजण भारतीय स्वतंत्र्याचा आजादी का अमृत महोत्सव साजरा करत आहोत. 2047 ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्याची शंभर वर्षे पूर्ण होणार आहे म्हणून यास अमृत काळाची पंचप्रण असे म्हटले आहे. ही पंचप्रण अधिक सक्षमपणे राबविणे गरजेचे आहे, त्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी युवा संवाद दूत म्हणून काम करून समाजात जनजागृती निर्माण करावी.
या कार्यशाळेसाठी संगमनेर तालुक्यातील सर्व महाविद्यालयातील राष्ट्रीय योजनेचे कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थी विकास अधिकारी संतोष सुर्वे,अशोक तांबे, अमित शिंदे, गणेश शेळके, जयराम डेरे, राजेंद्र गायकवाड, अक्षय पादीर, रामदास सोन्नर, दिपक गपले, पुष्पा भागवत उपस्थित होते.
या कार्यशाळेचे प्रस्ताविक राष्ट्रीय योजनेचे कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक म्हतू खेमनर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला विभाग प्रमुख कल्पना शेळके यांनी केले तर आभार विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी व विभागीय समन्वयक रणजीत गिरी यांनी मानले.
या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील पोपट खेमनर, गणेश कुलकर्णी, दत्तात्रय आसवले, राजेंद्र लेंडे, गणेश साळुंखे, योगेश साळुंखे, लक्ष्मण कातोरे, प्राजक्ता बिडवे, शबाना शेख, प्रियांका हाके, जया राशिनकर, शंकर राशिनकर, स्वाती सागर, संदीप खेमनर, पूजा वलवे, हर्षदा हारदे, स्वाती ढोकरे, मनोहर दूरगुडे सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
