राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मला याची काही कल्पना नाहीये. पण जर त्यांनी पवारसाहेबांची भेट घेतली असेल. त्यात वेगळं काही नाही. कारण वर्षानुवर्षे शरद पवार हे त्यांचे नेते राहिले आहेत. त्यामुळे जर ही भेट झाली असेल तर त्यात काही वावगं आहे, असं मला वाटत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेण्यामागे काही राजकीय समीकरणं आहेत, असं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मला त्याची काही कल्पना नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
