राज्यासाठी पुढचे ४८ तास महत्वाचे ; ‘या’ जिल्ह्यांना ५ दिवसांचा रेड अलर्ट

राज्यासाठी पुढचे ४८ तास महत्वाचे आहेत. राज्यात पुढचे पाच दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

तसंच, पुढच्या ३ तासांमध्ये ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, रायगड जिल्ंह्याना पुढील ५ दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडणार आहे. पुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट क्षेत्रात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाड्यात देखील पुढील ४ दिवस तुरळक पाऊस राहील. तर विदर्भात २१ तारखेनंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment