शरद पवारांना राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का बसला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिलेला आहे. पाठिंबा दर्शवण्यासाठी नागालँडमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार यांना पत्र पाठवले आहे.
दरम्यान संपूर्ण प्रदेश कार्यकरणीने आणि जिल्हाध्यक्षांनी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात नागालँडमध्ये पक्षाला मजबूत बनवायचं निश्चित केलं आहे.
तसेच दिल्लीत दि. २० जुलै रोजी नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वानथुंग ओडियो यांनी कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानच त्यांनी अजित पवारांना पाठिंबा जाहिर केला.
