हवामान विभागाने यापूर्वी 25 जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तविली होती. आता नवीन अंदाजानुसार, 25 जुलैनंतरही पावसाचा जोर वाढणार आहे.
राज्यात गुरुवारी कोकण, मुंबई आणि परिसरासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा, कोल्हापूर, सातारा तसेच विदर्भातील बहुतांश भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली.
तर मराठवाड्यातील अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू होता. असे असले तरी पुणे शहर आणि परिसरात गुरुवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली, तर घाटमाथ्यावरील पावसाचा जोर थोडा कमी झाला होता.
असे आहेत अलर्ट…
रेड : पालघर, ठाणे, मुंबईसह रायगड
ऑरेंज : रत्नागिरी, पुणे (घाटमाथा), कोल्हापूर
यलो : सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ
