अहमदनगर : मुळा धरण ‘एवढे’ टक्के भरले

नगर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या राहुरीच्या मुळा धरणाचा सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंतचा पाणीसाठा १३ हजार ४५६ दशलक्ष घन फूट झाल्याने धरण ५० टक्के भरले आहे.

मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा धरणाच्या पाणीसाठ्याची १८ हजार २ दशलक्ष घन फूट नोंद असल्याने धरण ५२ टक्के भरले होते. धरणाच्या पेप्सू जुलै महिन्यात धरण ५० टक्के भरण्याची आजची ३४ वी वेळ आहे.

सोमवार २४ जुलैला सकाळी ६ वाजता कोतुळकडून मुळाधरणात ६ हजार ७९२ क्युसेकने तर दुपारी १२ वाजता ११ हजार १५२ क्युसेकने तर सायंकाळी ६ वाजता ८ हजार ३७३ क्युसेकने नवीन पाण्याची आवक सुरू होती. या मौसमातील सोमवारी दुपारी बारा वाजेची आवक विक्रमी ठरली आहे.

Leave a Comment