संगमनेर(DSNews24/किरण पुरी) महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री, जनतेच्या मनातील कुटुंबप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामना वृत्तपत्राचे अंक मोफत वाटप करण्यात आलय.
तसेच जनसेवा कॅम्पचे आयोजन करत या कॅम्पमध्ये आभा कार्ड, आधार कार्ड, नवीन पॅन कार्ड, पॅन कार्ड अपडेट करणे, लहान मुलांचे आधार कार्ड हाताचे ठसे, इश्रम कार्ड असे विविध कार्ड व शासनाच्या योजनांचा लाभ मोफत देण्यात आलाय.
यावेळी सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी व युवकांनी मोठी गर्दी केलीय. शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी व तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात या कॅम्पचे आयोजन करण्यात आलय.
यावेळी शिवसेना शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बबन नाना घोलप व विधानसभा संपर्कप्रमुख अजयजी व्हानोळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख मुजीब शेख, पठार भाग प्रमुख संजय फड यांनी देखील सहकार्य केले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, युवा सेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, तालुका समन्वयक अक्षय बिल्लाडे, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, मुस्लिम मावळा अजिज मोमीन, शहर सचिव अनुप म्हाळस, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख परवेज शेख, शाखाप्रमुख प्रशांत खजुरे, शहर समन्वयक असिफ तांबोळी, विभाग प्रमुख माधव फुलमाळी, शिवसैनिक धरम कतारी, महेश कतारी तसेच लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.
