खेड: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज रविवारी शेकडो समर्थकांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
शहरातील महाड नाका येथील एसटी मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या जाहीर सभेत अखेर संजय कदम यांनी मशाल हाती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विश्वास काका कदम, विजय मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य नफिसा परकार, राजेंद्र आंब्रे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हाती शिवबंधन बांधले.
