पंजाबराव डख यांनी पावसासंदर्भात दिलीय मोठी अपडेट, 13 ऑगस्टपासून राज्यात…..

भारतीय हवामान विभागकडून पावसा संदर्भात एक महत्त्वपूर्ण अंदाज जारी करण्यात आला आहे. पुढील दोन महिने अर्थात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कमी पावसाचा अंदाज IMD ने व्यक्त केला आहे. सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख म्हणतात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात असा राहणार पाऊस.

पंजाबराव यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यात 5 ते 13 ऑगस्टपर्यंत राज्यात कोरडे वातावरण राहील. तथापि, 13 ऑगस्टनंतर राज्यात पावसासाठी अनुकूल हवामान पुन्हा एकदा येईल. हा पाऊस 30 ऑगस्ट पर्यंत राज्यातील विविध भागात हजेरी लावेल असे डख म्हणाले.

13 ऑगस्टपासून राज्यात पाऊस पुन्हा सुरू होईल. विशेष म्हणजे, 15 ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे, मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

पंजाबराव यांचा अंदाज खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, यात शंका नाही.

Leave a Comment