…..शिवसैनिक म्हणूनच काम करणार – गुलाबराजे भोसले

संगमनेर(DSNews24) शिवसेना व युवासेनेची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यासह जिल्ह्यातील तालुका कार्यकारिणी जाहीर करत विविध पदाधिकाऱ्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

संगमनेर तालुक्यातील साकूर पठारभागातील युवा नेते गुलाबराजे भोसले यांच्यावर युवा सेनेची तालुका संघटक पदी निवड करण्यात आली. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे बबनराव घोलप यांच्या आदेशाने ही निवड करण्यात आली आहे.

परंतु या निवडीवर युवा नेते गुलाबराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ते म्हणाले की, माझी तालुका संघटक पदी जरी निवड केली आहे. परंतु हे पद मी न स्वीकारता फक्त शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे गुलाबराजे भोसले यांनी सांगितले. त्यामुळे गुलाबराजे भोसले सध्या पदावर काम करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment