मोठी बातमी! ‘या’ ग्रामपंचायतीचा महत्वपूर्ण ठराव, प्रेमविवाह करायचा असेल तर…..

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील निफाड(Niphad) तालुक्यातील सायखेडा ग्रामपंचायतीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रेमविवाह (Love Affair) करायचा असेल तर आई-वडिलांची परवानगी घेणे गरजेचे आहे.

त्याशिवाय नोंदणी कार्यालयाने देखील परवानगी देऊ नये, असा ठराव नाशिक जिल्ह्यातील सायखेडा (Saykheda Village) ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे गावात यापुढे कुणाला प्रेमविवाह करायचा असेल तर नियोजित वधू-वराच्या आईवडिलांचे परवानगी पत्र अनिवार्य केले आहे.

प्रेमविवाहात अट टाकणारे आणि त्यासंबंधी ठराव पारित करणारे सायखेडा ग्रामपंचायत बहुदा राज्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. माजी सरपंच भाऊसाहेब काकडे यांनी याबाबतचे पंचायतीला पत्र दिले होते. त्यावर ग्रामसभा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान या ठरावानुसार आई-वडिलांचे परवानगीचे पत्र असेल तरच विवाहाची नोंद ग्रामपंचायती दप्तरी करण्यात येईल. त्यांनाच विवाह केल्याचा दाखला मिळेल असा ठराव नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला. सदर ठरावाची प्रत तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.

या निर्णयाची महाराष्ट्रात अंमलबजावणी व्हावी यासाठी कायदा करुन आदर्श कुटुंब पद्धती अंमलात यावी, यासाठी आता सरपंच गणेश कातकाडे, सुधीर शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार आहेत.

तसेच मुख्यमंत्री यांच्यासह संबंधित मंत्री, अधिकारी यांचीदेखील भेट घेऊन त्यांना साकडे घालणार आहे. या ठरावाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Leave a Comment