वीजतारांची चोरी करताना बसला शॉक अन्…. नगरमधील घटना 

विजेचा शॉक बसून बोल्हेगाव येथील युवकाचा मृत्यू झाला. रोहित दत्तात्रय चौधरी (वय 20) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, हा प्रकार नारायणडोह (ता. नगर) येथील रेल्वे लाईनची तार चोरी करताना झाला असून चौधरीसोबत असलेल्या इतरांनी त्याचा मृतदेह एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील बोल्हेगाव पुलाजवळ आणून टाकला. नारायणडोह येथील रेल्वे लाईनची तांब्याची तार 19 ऑगस्ट रोजी चोरीला गेली होती.

याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. तार चोरीला जात असल्याने रेल्वे प्रशासनाने तारेमध्ये विद्युत प्रवाह सोडला होता. दरम्यान, चौधरी व त्याच्यासोबतचे इतर युवक तार चोरी करण्यासाठी गेले असता तेथे शॉक लागून चौधरी याचा मृत्यू झाला आहे.

त्याचा मृत्यू होताच मृतदेह एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत नागापूरच्या पुलाजवळ आणून टाकला. चौधरी सोबतचे सहकारी पसार झाले आहे. त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान, चौधरी याच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली

Leave a Comment