अकोले तालुक्यातील वीरगाव येथील धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आनंदगड वीरगाव येथे जनसामान्यांचे कैवारी, मानवतेचे पुजारी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. सुनील दातीर, आनंदगड शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मा. रावसाहेब वाकचौरे, संस्थापक सचिव मा. अनिल रहाणे, संचालिका मा. सौ सुप्रिया वाकचौरे, मा. सौ गीता रहाणे, शाखा अभियंता मा. अरुण खुळे, सामाजिक कार्यकर्ते मा.संदीप दराडे, वीरगावचे उपसरपंच मा. जयवंत थोरात, विकास सेवा सोसायटी वीरगावचे चेअरमन मा. सुनील बापू वाकचौरे, किसनराव अस्वले, दत्तात्रय वाकचौरे, रामनाथ टेमगिरे, भगवान राजे थोरात, भाऊसाहेब अस्वले, काशिनाथ राक्षे, विजय वाघ, गोकुळ वाघ, अक्षय राहणे, शिवराज वाकचौरे, अनिल डोळस, मा. सरपंच दिनेश वाकचौरे, प्राचार्य किरण चौधरी, अधीक्षक रवींद्र आंबरे, सुपरवायझर अलका आहेर, अंजिरा देशमुख, पिंगला तोरमल आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. सुनील दातीर हे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व सन्माननीय मान्यवरांचे विद्यार्थिनींनी स्वागत गीतातून स्वागत केले. त्यानंतर सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आठवणींना उजाळा म्हणून शाळेत घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर आनंदगड शैक्षणिक संकुलातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला.
त्यानंतर कॅम्पस डायरेक्टर प्रा. संदीप थोरात यांनी दिघे साहेब यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त करत दिघे साहेब यांचा धगधगता जीवन प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संदीप दराडे यांनी आपल्या मनोगतातून धर्मवीर आनंद दिघे साहेब आपणा सर्वांचे प्रेरणास्थान असून त्यांचे कार्य अनमोल होते. गोरगरिबांसाठी ते साक्षात परमेश्वर होते. त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या नावाने ग्रामीण महाराष्ट्रातील नंबर एकचे शैक्षणिक संकुल चालवणारे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे हे अकोले तालुक्यातील खरे धर्मवीर आहेत असे गौरउदगार यावेळी काढत धर्मवीर दिघे साहेबांना अभिवादन केले.
त्यानंतर आनंदगड शैक्षणिक संकुलाचे संस्थापक सचिव मा.अनिल रहाणे यांनी आपल्या मनोगतातून धर्मवीर आनंद दिघे साहेब ठाणे येथील असून त्यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. तरीही ग्रामीण भागात धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे कार्य पोहोचवण्याचे मुख्य कार्य सन्माननीय रावसाहेब वाकचौरे यांनी केले व आपल्या शैक्षणिक संकुलाचे नाव धर्मवीर आनंद दिघे यांचे द्यावे अशी संकल्पना मांडली धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या तेजस्वी कार्याच्या प्रेरणेने हे शैक्षणिक संकुल आम्ही चालवतो.
आज संपूर्ण महाराष्ट्रात आनंदगड शैक्षणिक संकुल प्रसिद्ध आहे हा दिघे साहेबांचा आशीर्वाद आहे. असंख्य अडचणींवर मात करत आज या शैक्षणिक संकुलाने गगन भरारी घेतली ही देखील दिघे साहेबांचीच कृपा आहे. ठाणे येथील टेंभी नाका या ठिकाणी जाऊन दिघे साहेब यांच्या जीवन चरित्राचा संपूर्ण अभ्यास मी केला त्यातून मी देखील प्रेरित झालो दिघे साहेबांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या आयुष्यात अद्वितीय कार्य करावे असे आव्हान विद्यार्थ्यांना यावेळी त्यांनी केले.
धर्मवीर आनंद दिघे साहेब केवळ ठाण्याचे नसून ते अखंड हिंदुस्तानचे दैवत आहे. त्यांच्या कार्यातून प्रभावित होऊन आपण या शैक्षणिक संकुलाचा पाया रोवला. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे आनंदगडावर स्मारक नाही तर मी तीर्थ बनवले आज असंख्य विद्यार्थी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या कार्यातून प्रेरित होऊन आज यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेले आहेत हीच खऱ्या अर्थानं धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना आदरांजली आहे असे विधान यावेळी आनंदगड शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष माननीय रावसाहेब वाकचौरे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणातून सुनील दातीर यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या कार्याला महाराष्ट्रातील ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य आनंद दिघे यांचे उपासक रावसाहेब वाकचौरे यांनी केले त्यांची प्रेरणा घेऊन आज आनंदगड गुणवत्तेच्या आधाराने गगन भरारी घेत आहे. आज असंख्य शास्त्रज्ञ, समाजसेवक, डॉक्टर,इंजिनियर, क्लासवन अधिकारी या शैक्षणिक संकुलात तयार होत आहेत हीच दिघे साहेब यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे असे मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी गणपत येलमामे, गणेश पवार, दत्ता गोरे, छाया शिंदे, जयश्री देशमुख, कल्पना पवार, प्रतीक्षा राहणे, ऋतुजा वाकचौरे यांसहअनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नफिसा शेख यांनी तर सूत्रसंचालन शिल्पा देशमुख यांनी केले. आभार देविदास चारोडे यांनी मांडले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदगड शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
