शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने पावसाबाबत महत्वाची माहिती दिली आहे…
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत राज्यातील बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार असून या पार्श्वभूमीवर काही भागांना यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
तर आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडेल असंही हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील तीन दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळेल असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
तसेच ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हीच स्थिती राहील असे हवामान विभागाने सांगितले आहे.
तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
याशिवाय ८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रात सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
