भारतीय हवामान विभागाकडून (IMD) पावसाबाबत नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागनं पुढील 24 तासांसाठी पुणे शहरात येलो अलर्ट जारी केला आहे.
काय आहे नवा अंदाज
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुणे शहरात पुढील 24 तास यलो अलर्ट जारी केला आहे.
पुण्यासह सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये 31 ऑगस्ट रोजी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
