आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

मिथुन : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

कर्क : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

तूळ : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

 

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

धनू : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

मकर : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

 

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्याता. व्यवसायात वाढ होईल.

 

मीन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी आणि आशावादी राहील.

Leave a Comment