जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या लोकांवर लाठीचार्ज केल्याच्या घटनेचे पडसाद आता राज्यभर पसरू लागले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे मराठा मोर्चा आणि इतर संघटनांशी संबंधित लोकांमध्ये संताप आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यात लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत. या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली.काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?ज्या निष्पाप लोकांवर लाठीचार्ज झाला, त्याबद्दल क्षमा मागतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. या पूर्वी देखील मी गृहमंत्री होता, वेगळ्या विषयावर 2 हजार आंदोलनं झाली. कधीही आम्ही बळाचा उपयोग केला नाही, आताही बळाचा वापर करायची गरज नव्हती. ज्या निष्पाप लोकांवर लाठीचार्ज झाला, जे जखमी झाले, त्यांना इजा झाली, त्याबद्दल मी क्षमा मागतो.
आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची संपूर्ण उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी बोलताना दिले.
