बीडमध्ये ३५ वर्षीय शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या अंतरवन पिंपरी शिवारात ही घटना घडली आहे. शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉटस्अॅपवर स्टेटस ठेवले होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील आश्रमशाळेवर कार्यरत असणार्या 35 वर्षीय शिक्षकाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बीडच्या अंतरवन पिंपरी शिवारात घडलेल्या घटनेने परिसरात ही घटना घडली आहे.
शिक्षकाने व्हॉटस्अॅपवर स्टेटस ठेवून टोकाचे पाऊल उचलले आहे. अंकुश रामभाऊ पवार असं या शिक्षकाचे नाव आहे. अंकुश हे आश्रमशाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्पूर्वी, मृत शिक्षकाने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटलंय की, मी अंकुश रामभाऊ पवार, अमित अनवणे व कोमल अमित अनवणे व त्याच्या भावाने म्हणजे दत्ता गायकवाड, आकाश गायकवाड याची आई या सर्वांनी मिळून मला दहा लाख रुपयांची मागणी केली.
त्यांना मी पाच लाख रुपये दिले. मात्र तरीही ब्लॅकमेल करू लागले. मला मारण्याची धमकी देऊ लागले. कुटुंबालाही धमक्या दिल्या जात होत्या, असा उल्लेख चिठ्ठीमध्ये करण्यात आला आहे.
तसेच चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने बीड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
