अजितदादा लवकरच परत येणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या 

राष्ट्रवादीच्या फुटीवर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. ‘अजितदादा पुन्हा राष्ट्रवादीत येतील का? या प्रश्नाचे त्यांनी सूचक उत्तर दिले.

“तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो.., ही वैचारिक लढाई आहे, निवडणुकीच्या वेळी ती राजकीय लढाई होईल. राष्ट्रवादीत कुठलीही फूट नाही, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत,” असे त्या म्हणाल्या. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्यांवर लाठीमार करणाऱ्यांचा त्यांनी निषेध केला. “या प्रकाराला गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत,” असे सुळे म्हणाल्या.

Leave a Comment