मुंबईत पुढील ४ दिवस हवामान विभागाचा मोठा इशारा 

शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मुंबईत पुढील ४ दिवस कधी आणि किती पाऊस पडेल याचा अंदाज वर्तवला आहे. यानुसार आज (७ सप्टेंबर) मुंबईसह आजूबाजूच्या भागात पावसाच्या हलक्या सरी बरसतील.

आयएमडीने मुंबईसाठी ७, ८, ९ सप्टेंबरला ग्रीन अलर्ट जारी केला आहे. या तीन दिवसात मुंबईत हलक्या सरींसह पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

तसेच १० सप्टेंबरला मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या दिवसी वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

७ सप्टेंबरला राज्याच्या सर्वच भागात पाऊस अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात उत्तर कोकण, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भासह गोव्याचाही समावेश आहे.

Leave a Comment