संपूर्ण ऑगस्ट महिना जवळजवळ कोरडा गेल्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. सप्टेंबरच्या उर्वरित काळात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याने शनिवारी दिली.
गुरुवारपासून Monsoon active मान्सून राज्यात सक्रिय झाला. कोकण, मराठवाडा आणि विदर्भासह बहुतांश भागांमध्ये कोसळत आहे.
यामुळे शेतकरी सुखावला आहे. कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दोन दिवस कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या काळात मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस कोसळेल. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
