केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये २०० रुपयांची घट करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आता मध्य प्रदेश सरकार गॅसच्या किंमती ४५० रुपये करण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांनी याबाबत घोषणा केली.
मध्य प्रदेशातल्या खरगोनमध्ये जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आलेली होती. या यात्रेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांनी मोठी घोषणा केली.
ते म्हणाले की, आता फक्त उज्ज्वला योजनेसाठी नाही तर सरसकट गॅस सिलिंडर साडेचारशे रुपयांना मिळेल. त्यासाठी कार्यवाही सुरु असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
