चार एकर सोयाबीन पिकावर फिरवला नांगर, पठारभागातील शेतकऱ्यावर का आली अशी वेळ, वाचा…

संगमनेर(DSNews24/सतिश फापाळे) तालुक्यातील पठार भागात पावसाने पाठ फिरवली असल्याने खरीप हंगामातील विविध पिके कोमेजून गेली आहे.यात प्रामुख्याने सोयाबीन पिके जळून गेली आहे.अशातच निराश झालेले नांदूर गावच्या युवा शेतकऱ्याने नाईलाजास्तव चार एकर सोयाबीन पिकावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगर फिरवत सोयाबीन पिक नष्ट केले आहे.

नांदूर_खंदरमाळ गावचे युवा शेतकरी सुरेश गोपीनाथ भागवत या शेतकऱ्याने जून महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसावर आपल्या शेतीची मशागत करून सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. हे पीक सुरवातीच्या पावसावर डौलदार उतरून देखील आले होते. सोयाबीन पिकाला उभारी मिळाल्या नंतर त्यात मध्यंतरी थोडासा पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाची खुरपणी करून खते टाकली. कीटक नाशकांची फवारणी केली होती.मोठ्या कष्टाने पिकवलेले हे पीक जोमात होते.

सोयाबीन पिक ऐन बहरात आले. फुलाची झडण झाली.थोड्या बहुत प्रमाणात शेंगा देखील दिसू लागल्या होत्या.परंतु वरून राजाने याच वेळी पाठ फिरवली.आणि होत्याचे नव्हते झाले. पावसा अभावी सोयाबीन पीक पीक करपू लागले. काही सोयाबीन पिकाला शेंगाच आल्या नाही.तर काही जळून गेले. अशातच लाखो रूपये खर्च करूनही पीक हाती न आल्याने नाराज झालेल्या युवा शेतकरी सुरेश भागवत यांनी चार एकर सोयाबीन पिकावर नांगर फिरवत नष्ट केले आहे. त्यात उभा झालेला कर्जाचा डोंगर कसा पार करायचा या चिंतेने हतबल झाला आहे.

यादरम्यान पठार भागातील बहुतांश खरीप हंगामातील पिके जळून खाक झाली आहे.बऱ्याचशा शेतकरी बांधवानवर उभ्या पिकावर रोटर, नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. तरी देखील या नुकसान झालेल्या पिकांचे प्रशासन विभागाने पंचनामे न केल्याने शेतकऱ्याचे जखमेवर मिठ चोळले असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहे. आता तरी प्रशासने जागे होत.नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांचे पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी पठार भागातील शेतकरी बांधव करतं आहे.

 

कोट

_युवा शेतकरी सुरेश गोपीनाथ भागवत नांदूर _खंदरमाळ

नांदूर गावचे शिवारात वडिलोपार्जित शेतजमीन कसून माझे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे.सर्वच क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली होती.लाखो रुपये खर्च करूनही पावसा अभावी सोयाबीन पीक जळून गेले आहे. या पिकासाठी झालेला खर्च निघू शकत नाही. चार एकर सोयाबीन पिक चांगले आले नाही.

त्यातून काहीच हाती लागणार नसल्याचे दिसून आले.मोठ्या आशेने काबाडकष्ट करून उभे केलेल्या पिकाने पदरी निराशा पडली. उघड्या डोळ्यांन समोर पीक जळत असल्याने पाहवत नव्हते. काळजावर दगड ठेवत ट्रॅक्टरच्या साहाय्याने चार एकर सोयाबीन पीक नांगरून नष्ट केले आहे.

Leave a Comment