अजितदादांच धक्कादायक विधान, म्हणाले अर्थमंत्रीपद राहिल कि नाही….

बारामती : भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल दिवसभर मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते.

पण उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हते. अजित पवार यांनी मुद्दामहून मुंबईत राहणं टाळलं का? अशी चर्चा काल दिवसभर सुरू होती. ही चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांचं एक मोठं विधान आलं आणि पुन्हा चर्चांना उधाण आलं.

अजित पवार यांनी थेट त्यांच्या अर्थ खात्याशी संबंधित विधान केलं आणि राजकीय वर्तुळाला कामाला लावले. अजितदादांच्या विधानाचा उलटसुलट अर्थ काढला जात असतानाच दुसरीकडे भाजपला त्यावर सावरासावर करताना दमछाक झाली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना अजितदादा यांनी हे विधान केलं. आपल्या संस्था ताकदवान झाल्या पाहिजे. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे.

आज अजित पवार मंत्रिमंडळात आहे. हातात अर्थ खातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण हे पुढे टिकेल की नाही माहीत नाही. पुढचं कुणी पाहिलं नाही, असं अजित पवार म्हणाले. अजितदादा यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Leave a Comment