मुंबई (DSNews24/किरण पुरी) राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दहिसर मुंबई येथे आले असता यावेळी त्यांनी भाजपाचे मित्र पक्ष असलेले राष्ट्रीय स्वराज सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीहरी बागल यांची भेट घेतली.
ॲड. श्रीहरि बागल म्हणाले, लोकसभेच्या ४८ जागा जिंकू आणि पुन्हा नरेंद्र मोदी याना पंतप्रधानपदी विराजमान करून इतिहास रचुया. विरोधकांना क्लीन बोल्ड करून लोकसभेच्या १०० टक्के जागा निवडून आणण्याचा विश्वास त्यांनी दाखवून दिला. याच विजयाची पुनरावृत्ती हि चंद्रशेखर बावनकुळे, आ. प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनात याची पुनरावृती हि विधानसभा – २०२४ ला होणार असे सांगून राष्ट्रीय स्वराज्य सेना या राजकीय पक्षाने कामाला सुरवात केली असल्याचे या भेटीत सांगीतले.
दरम्यान, या झालेल्या भेटीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रीय स्वराज्य सेना(राजकीय पक्ष) चे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष पोपट फुकटे, सोलापुर जिल्ह्य अध्यक्ष अॅड. सुग्रीव बागल, जालना जिल्हा सचिव सुनील सोनार व मुंबई अध्यक्ष व महाराष्ट्र अध्यक्ष व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
