राज्यात पावसाचा मोठा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट 

मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये ऑक्टोबर हिटमुळं नागरिक हैराण झाल्याचं पाहायला मिळालं. सकाळ आणि दुपारच्या वेळी तापमानाचा होणारी वाढ पाहता हवामान विभागाकडूनही नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं.

आता त्यातच परतीच्या वाटेवर निघालेला पाऊस जाता जाताही राज्यातील काही भागात बसरणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागांतून पावसानं विश्रांती घेतलेली असली तरीही कोकण आणि गोव्यालगत असणाऱ्या काही भागांमध्ये मात्र तो पुन्हा एकदा बरसणार आहे.

कोकणातील किनारपट्टीनजीकच्या काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसम्याची शक्यता आहे. तर, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतही काही तासांसाठी पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते.

Leave a Comment