तरुणाची गळफास घेवून आत्महत्या, नगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर : पैशाच्या व्यवहारातून तरुणाला त्रास दिल्याने त्याने आत्महत्या केल्याची घटना बोल्हेगाव उपनगरात बुधवारी (दि. 11) रात्री घडली.

संजय साहेबराव भवर (वय 40 मूळ रा. कोहिम ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. शनिधाम, साईनगर, बोल्हेगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. सदरचा प्रकार गुरूवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आला.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सुरूवातीला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मयताकडे आढळलेल्या चिठ्ठीतून आत्महत्येचे कारण समोर आले आहे.

मयत संजय भवर यांचा भाऊ रमेश साहेबराव भवर (वय 45, रा.कोहिम, ता. आष्टी, जि. बीड) यांनी गुरूवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रकांत पाबले (पूर्ण नाव माहिती नाही, रा.केडगाव)याच्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Leave a Comment