साकूर येथील साईबाबा पतसंस्थेच्या ‘त्या’ प्रकरणी नवीन मोठी बातमी समोर 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील साईबाबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत गेल्या सहा वर्षापुर्वी कोट्यावधी रुपयांचा अपहार झाल्याच उघडकीस आले होते.

त्यामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान सहा वर्षांनंतर अहमदनगर जिल्हा तक्रार निवारण आयोगाने ठेवीदारांच्या बाजूने निकाल देत तक्रारदार ठेवीदारांना ३० दिवसांच्या आत ठेवी व्याजासह संचालक मंडळाने देण्याचे आदेश दिले होते.

सदर मुदत संपायला अवघे काही दिवस बाकी असल्याने संचालक मंडळ जिल्हा तक्रार निवारण आयोगाच्या निकालाला आव्हान देण्याची शक्यता आहे. त्याआधीच तक्रारदार ठेवीदार भिमराज जाधव यांनी खबरदारी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सावधानपत्र ( कॅव्हेट ) दाखल केले असल्याची माहिती दिलीय.

दरम्यान सदर संचालकांच्या मंडळात ३ शिक्षक देखील आहे. सदर शिक्षक संचालकासंदर्भात देखील तक्रारदार ठेवीदार भिमराज जाधव व विकास पवार यांनी संगमनेर पंचायत समिती येथील गटशिक्षणाधिकाऱ्याकडे दोन वेगवेगळ्या प्रकारचे माहितीचा अधिकार अर्ज दाखल करून त्या शिक्षकांची माहितीच मागवली आहे.  त्यामुळे भविष्यात शिक्षक संचालक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment