ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा आझाद मैदानावर आज दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या आधी ठाकरे गटाने शिंदे गटावर टीकास्त्र डागण्यात आलं आहे.
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली आहे. रावण हा अहंकारी होता आणि त्याचा नाश अहंकारानेच झाला. आज दसरा मेळावा त्या रावणाचा आज अहंकाराचा नाश केल्याशिवाय राहणार नाही.
2024 च्या दसरा मेळाव्यावेळी दिल्लीत आणि महाराष्ट्रात शिवसेनेचे राज्यकर्ते बसले असतील. पुढच्या वर्षी शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही टीका केली आहे. मोहन भागवत लोकशाही मानत नाहीत का? या देशात भिन्न विचाराचे लोक येऊ नये का? मोहन भागवत यांना लोकशाहीचे आम्ही संरक्षक मानतो.
या देशात भिन्न विचाराचे लोकांनी एकत्र येऊ नये का? मी मोहनराव भागवतांना एक सांगू इच्छितो की, बाळासाहेब देवरस सरसंघ चालक हे आणीबाणीच्या काळात तुरुंगात होते. तेव्हा देखील भिन्न विचाराचे लोक एकत्र आले. तेव्हा भारतीय जनता पक्ष देखील होता. त्यांनी हुकूमशाहीचा पराभव केला, असं संजय राऊत म्हणाले.
