Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारच वाढवल टेन्शन, जाहीर केला मोठा निर्णय 

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे त्यांनी त्यांनी रुग्णालयात माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

माझी प्रकृती चांगली असून मी ठणठणीत आहे. काळजी करु नका. डॉक्टरांनी मला ठणठणीत बरं केल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. माध्यमांशी बोलताना त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. मराठा समाजावर आतापर्यंत खूप अन्याय झालाय. परंतु, आता चांगले दिवस आलेत. आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ येतोय. तसंच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपलं आंदोलन सुरू राहणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय.

 

पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार :

मनोज जरांगे पाटील यांनी आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं सांगितले. दौरा कधीपासून सुरू होणार ते उद्या किंवा परवा जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. जरांगे पाटील म्हणाले, या दौऱ्यात आतापर्यंत राहिलेल्या भागांत आपण जाणार आहोत. मराठा समाज बांधवांची भेट घेणार आहे. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासाठी राज्यातील प्रत्येक गावात 1 डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

 

आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही :

आपलं आंदोलन शांततेचं आणि लोकशाही मार्गाचं आहे. उद्रेक होईल, असं काही करू नका. अस आवाहनही जरांगे पांटलांनी केलंय. आता कोणीही आत्महत्या करू नका. 24 डिसेंबरपर्यंत आपणास खांद्याला खांदा लावून लढायचं आहे. न्यायाचा दिवस जवळ आलाय. न्याय मिळवण्यासाठी सातत्य ठेवावं लागणार असल्याचं जरांगे पाटलांनी यावेळी सांगितलं.

आतापर्यंत आमच्यावर खूप अन्याय झालाय. हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालेलं नाही. आम्हाला शेती पाहून मुलांसाठी काम करायचं आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा मनोज जरांगे पाटील यांनी पुनरुच्चार केला.

Leave a Comment