भाजप, राष्ट्रवादी युतीबाबत भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले महाराष्ट्रातही….

Political : नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजप सत्तेत असलेल्या सरकारला पाठिंबा दिला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. चर्चा सुरू झाल्यानंतर आपण सरकारला नाही तर मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

मात्र आता खासदार उदयनराजे(Udyanraje) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नागालँड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र सत्ता स्थापन करत आहेत, याबाबत उदयनराजे यांना विचारले असता त्यांनी खोचक टोला लगावला आहे. त्या बैठकीला मला बोलावलं नसल्याचं त्यांनी म्हटलं.

पुढे बोलताना ते म्हणाले की, जर तिथं ठरल असेल तर उद्या महाराष्ट्रातही ठरू शकत, अस सूचक विधान उदयनराजे यांनी केलं आहे. उदयनराजे यांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. यापूर्वी असंच विधान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं होतं.

नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा दिला जर महाराष्ट्रात आमच्यासोबत आले तर स्वागत असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं.

Leave a Comment