BREKING! शिंदे गटाला मोठा धक्का ; यांचे सामूहिक राजीनामे

बुलढाणा(Buldhana) जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात नवीन चेहऱ्याला तालुकाप्रमुख पदी नियुक्ती देणार आहेत. त्यामुळे शिंदे गटातील शिवसेनेत अस्वस्थता आहे.

त्यावर आक्षेप घेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, खामगाव तालुकाप्रमुख सुरेश वावगे, युवासेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे, शहराध्यक्ष रमेश भट्टड यांच्या सह 17 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे दिले आहेत.

त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात घाटा खालील भागात शिंदे सेना खिळखिळी झाली आहे. शिवसेनेचे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रतापराव जाधव यांच्या नावाने हे पत्र लिहण्यात आले आहे.

Leave a Comment