IND vs AUS T20 Series : वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
मात्र हे दोन्ही संघ 2 दिवसांनी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. उभय संघांचे लक्ष्य आता पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेवर असणार आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया T20 मालिकेचे वेळापत्रक
टी-20 विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी अर्थात 2024 मध्ये खेळवली जाणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेची तयारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेपासून सुरू करेल. ही मालिका 23 नोव्हेंबरपासून भारतात खेळवली जाणार आहे.
मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. दुसरा सामना 26 नोव्हेंबरला त्रिवेंद्रममध्ये तर तिसरा सामना 28 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे खेळवला जाईल.
यानंतर चौथा टी-20 सामना 1 डिसेंबरला नागपुरात तर मालिकेतील शेवटचा सामना 3 डिसेंबरला हैदराबादमध्ये खेळवला जाईल.
