मोठी बातमी! अजित पवार गटाला आणखी ३ मंत्रिपदे मिळणार, निलेश लंके…..

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. नव्या विस्तारात अजित पवार गटाला आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद आणि दोन राज्यमंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटाकडून मकरंद आबा पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास राज्याचा तिसरा टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार हा पूर्ण होईल. या विस्तारामध्ये राष्ट्रवादीला तीन मंत्रिपदे म्हणजे एक कॅबीनेट आणि दोन राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे महामंडळांचे वाटप करून सर्व कार्यकर्ते, नेत्यांचे नव वर्ष आनंदात सुरू होणार असल्याच्या चर्चा म्हटले जात आहे. महायुतीच्या सरकारचे अद्याप मंत्रीमंडळाचे वाटप बाकी आहे. म्हणून या विस्तारामध्ये अजूनही महामंडळाचे वाटप होण्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा भर कार्यक्रमात मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. सत्तेत सहभागी झाल्यानंतर मी मंत्री होईल, असे वाटले होते. परंतु अजूनही मला मंत्रिपद मिळाले नाही, त्यामुळे महादेवा मला मंत्री करा, असे म्हणत गोगावले यांनी महादेवाला साकडे देखील घातले आहे.

राज्याचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप न सुटलेला पेच यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे-फडणवीसांवर मोठा दबाव असल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या नाराजीची अधिकच चर्चा सुरू झाली आहे.

नाराजी नाट्यानंतर अजित पवारांनी तब्बल ७ मंत्र्यांना पालकमंत्रिपद देण्यात आले. आता मंत्रिमंडळ विस्तार झाला तर त्यामध्ये देखील अजित पवार गटाचा वरचष्मा पाहायला मिळत आहे. यात अजित पवार गटाकडून नीलेश लंके हे इच्छूक असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment