अरे देवा! लग्नाच्या मध्यरात्रीच नवरी पळाली

शिरूर तालुक्यात एक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. परंतु नवरी सासरी आल्यानंतर लग्नाच्या मध्यरात्रीच नवरीने लाखो रुपयांचे दागने घेऊन धूम ठोकली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चर्चांना उधाण आले आहे.

शिरूर तालुक्यातील तांदळी येथे हि घटना घडली आहे. तांदळी येथील एका कुटुंबाने मध्यस्थाच्या मदतीने मुलाचे लग्न जमवले होते. यासाठी त्या मध्यस्थ व्यक्तीने वरपित्याकडून दोन लाख रुपये रोख घेतले होते. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रमही नगर येथील एका हॉटेलमध्ये पार पडला होता. दोन्ही कुटुंबात ठरल्याप्रमाणे तांदळी येथे लग्न सोहळा पार पडला होता. गावकरीही मोठ्या उत्साहाने या शुभकार्यात सहभागी झाले होते.

लग्न झाल्यानंतर वधुकडील वऱ्हाडी निघून गेले होते. वधूसोबत रिवाजानुसार एक कलवरी थांबलेली होती. या दोघींनीही लग्नाच्या मध्यरात्री घराला बाहेरून कडी लावत अंगावरील व घरातील दागिन्यांसह चारचाकी गाडीतून धूम ठोकली. नवरीने धूम ठोकल्याचे लक्षात आल्यानंतर लग्नघरी एकच गोंधळ उडाला. आपली फसवणूक झाल्याचे

लक्षात येताच वरपित्याने मध्यस्थला फोन केला असता त्यानेही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे या कुटुंबाने शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment