सुप्रिया सुळेंच लोकसभेतून निलंबन, अजित पवार म्हणाले 

संसेदत गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षातील जवळपास १४३ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा समावेश आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारले असता. त्यावर अजित पवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलतांना अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या निलंबनावर भाष्य केलं आहे.

सुप्रिया सुळेंचं लोकसभेतून निलंबन करण्यात आलं आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया ? असा सवाल केला असता अजित पवार म्हणाले की, फक्त सुप्रिया सुळेंचं निलंबन झालं नाही. अनेक खासदारांचं निलंबन झालं आहे. जेव्हा खासदार किंवा आमदार विधिमंडळात, लोकसभेत आणि राज्यसभेत काम करत असतात. त्यावेळी कुठल्या तरी नियमाचा भंग झाल्यास त्याप्रमाणे कारवाई केली जाते. त्यानुसारच निलंबनाची कारवाई झालेली आपण पाहिली आहे.

दरम्यान, तिथे काय घडलं ? हे मला माहिती नाही. विधानसभेत काय घडलं? हे विचारलं असतं तर मी सांगितलं असतं. माझ्या माहितीप्रमाणे संसदेत उपराष्ट्रपतींचा अपमान करण्यात आला आहे. राष्ट्रपती , उपराष्ट्रपती , पंतप्रधान किंवा कुठल्याही राज्याचे मुख्यमंत्री असतील, ही महत्वाची पदं आहेत.

एवढ्या मोठ्या भारतात लोकशाही पद्धतीने निवडून गेलेले ते लोक असतात. ते आपापलं काम योग्य पद्धतीने करत असतात. कारण ज्यावेळी एवढा मोठा समाज त्यांच्या पाठिशी उभा राहतो. आणि त्यांच्या विचारांच्या लोकांना निवडून देतो. याचा अर्थ त्यांनी कुठेतरी जनाधार मिळावलेला असता. असंही असंही त्यांनी म्हटलं.

Leave a Comment