महाराष्ट्रातील लोकसभेची धक्कादायक आकडेवारी समोर, बघा जनतेचा कौल…

देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. येत्या तीन ते चार महिन्यात निवडणुकांची आचारसंहिता लागू होऊ शकते. लोकसभेसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि विरोधी आघाडी इंडिया यांच्या मुख्य लढत होत आहेत.

दरम्यान लोकसभेसाठी जनतेचा कल कोणाकडे आहे, याचे सर्वेक्षण सी-व्होटर, एपीबीने केले आहे. यामध्ये राज्यात महायुतीला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

२०२४ मध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे. तर इंडिया आघाडीही आपण विजय होणार असल्याचा दावा करत आहे. दरम्यान, एक नवीन सर्वेक्षण समोर आले आहे. यात राज्यात भाजपला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.

देशातील पाच मोठ्या राज्यांत जनमत चाचणी घेण्यात आली. याचे आकडे धक्कादायक आहेत. पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांचा समावेश करून लोकसभेच्या एकूण २२३ जागा आहेत. या जागांवरच्या विजयामुळे देशात कोणाची सत्ता येणार हे ठरते. महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजपची सरशी होताना दिसत आहे. त्यातच राममंदिर उद्घाटनाचा फायदा भाजपला होताना दिसत आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. ओपिनियन पोलमध्ये इंडिया आघाडीचा वरचष्मा दिसत आहे. महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक झाली असती तर महायुतीला १९ ते २१ जागा मिळतील. तर इंडिया आघाडीला २६ ते २८ जागा मिळतील. अन्य पक्षांच्या खात्यात ०- २ जागा जाण्याची शक्यता आहे. राज्यातील एकूण मतांपैकी ३७ टक्के मते महायुतीला तर ४१ टक्के मते महाआघाडीच्या वाट्याला जाऊ शकतात. अन्य पक्षांना २२ टक्के मते जाऊ शकतात.

Leave a Comment