काॅंग्रेस पक्षाचा आज स्थापना दिवस असून नागपुरात यानिमित्ताने जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जवळपास ४० एकरवर काॅंग्रेसची सभा होणार असून या सभेसाठी देशातील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी काॅंग्रेसने है तयार हम अशी थिम ठेवली आहे. राहुल गांधींसह अनेक नेत्यांचे नागपूरात पोस्टर लावण्यात आले आहे. तर या अभियानावरून आता भाजपने काही सवाल केले आहेत. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खास चारोळी केली आहे.
नागपुरात होत असलेल्या काॅंग्रेसच्या जाहीर सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. नागपुरात ठिकठिकाणी काॅंग्रेसकडून मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावरून भाजपसह अनेक विरोधी नेत्यांनी काॅंग्रेसवर टिका केली आहे.
तर रामदास आठवले यांनी पुन्हा चारोळी करत काॅंग्रेसला डिवचलं आहे.
काँग्रेस की रॅली है तय्यार है हम ;
लेकीन हम भी नही कुछ कम;
नरेंद्र मोदीजी मे बहोत ही है दम !
विरोधी पक्ष मे बैठने के लिये तयार है तुम;
लेकीन सत्ता मे आयेंगे नरेंद्र मोदीजी के साथ हम !!
असं म्हणत रामदास आठवले यांनी काॅंग्रेसच्या अभियानावर भाष्य केलंय.
