सध्या लग्न सराईचा हंगाम सुरु आहे. अनेक लोक लग्नाच्या तयारीत असून काहींचं लग्नही झालं आहे. मात्र लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये अनेक धक्कादायक घटना घडल्याचं समोर येत असतं.
लग्नाच्या अगोदर किंवा नंतर नवरा नवरीचे अनेक कांड उघड होतात आणि मग पायाखालची जमिनच सरकते. आत्तापर्यंत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच यामध्ये आणखी भर पडत बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला.
लग्न झालेल्या नव्या नवरीने अवघ्या पाच दिवसात खरेदीला जाते सांगून धूम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बीडच्या आष्टी शहरातील एका फळविक्रेत्यानं मध्यस्थाला 2 लाख रुपये देऊन लग्न केलं होतं. माञ लग्न झाल्यावर अवघ्या 5 दिवसांत नवरीनं कुटुंबीयांना खरेदी करण्यासाठी बाजारात चालले असं सांगून गुंगारा देऊन पळून गेली. याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. लग्नाळू मुलांना फसवणारी टोळी तर नाही ना याचा तपास पोलीस घेत आहेत.
आष्टी शहरांतील लक्ष्मण धोंडे यांच्या साडुच्या मुलास मुलगी दाखवतो म्हणून आरोपी माधव रामजी भालेराव मु.पो.मुसोड ता.कळमनुरी जि.हिंगोली यानं 2 लाख रुपये घेतले. मुलगी मुलाला पसंत पडल्यावर पाहणी झाली त्याच ठिकाणी हार घालून विवाह करण्यात आला व लगेच आरोपीने 2 लाखाची मागणी केली. व्यापा-याने ही 2 लाख दिले. पुन्हा आष्टी शहरात विवाह लावण्यात आला. लग्नाच्या पाचव्या दिवशी खरेदीचं कारण सांगून नवविवाहित नवरी बाजारात गेली परत आलीच नाही.
दरम्यान,तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिचा मोबाईलही बंद होता. मध्यस्थीला संपर्क केला असता तो आजारी आहे. आज येईल उद्या येईल सांगण्यात आलं व टाळाटाळ करण्यात येताच फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. यावरून आष्टी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी पोलीस अधिक तपास करत आहे.
