खेड्यांच्या समृद्ध विकासासाठी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे – सभापती शंकरराव पा.खेमनर

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) भारत हा खेड्यांचा देश आहे. या खेड्यांच्या समृद्ध व शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचे योगदान महत्त्वाचे आहे. यांच्या श्रमदाना मुळे खेड्यांचा विकास करता येतो.खेडे विकासाच्या दृष्टीने समृद्ध झाल्यास देश सशक्त होईल असे प्रतिपादन संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व आदर्श सरपंच मा. शंकरराव पा. खेमनर यांनी केले.

ते रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मा.दिपकजी फिरोदिया होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास – लोकसंख्या नियंत्रण व जनजागृती या उपक्रमाअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर मंगळवार दि. 16/01/ 2024 ते सोमवार दि.22/04/2024 या कालावधीत हिवरगाव पठार ता. संगमनेर येथे संपन्न होत आहे.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद अहमदनगरच्या मा. सभापती सौ मिराताई शेटे उपस्थित होत्या. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर गावच्या सरपंच कु.सुप्रियाताई मिसाळ, उपसरपंच मा. दत्तात्रय पा. वनवे, यादव पा. नागरे, मा.शेरपुद्दिन शेख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा. नानासाहेब नरवडे, ग्रामविकास अधिकारी मा. विकास आहेर, देवराम पा.नागरे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन घोलप,प्रो.डॉ.हेमलता राठोड, मा.भाऊसाहेब नागरे, मा.रामदास गोंदके ,उपप्राचार्य प्रा.रंजीत गिरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक प्रा. म्हतू खेमनर, मा.सी.ए विक्रम नागरे, मा.वैभव मिसाळ, मा.प्रकाश मिसाळ, मा.भाऊसाहेब उगले व इतर मान्यवर उपस्थित होते.

सभापती मा.सौ. मीराताई शेटे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणण्यात व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचा सर्वात मोठा वाटा आहे ,मला सुद्धा या शिबिराचा खूप मोठा फायदा झाला आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ. सचिन घोलप यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन शिबिर कालावधीत राबवले जाणारे उपक्रम यांची माहिती दिली, ते म्हणाले की महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना समाजसेवा करणे, आपल्या जवळच्या परिसरातील लोकांमध्ये मिसळून त्यांना समजावून घेऊन रचनात्मक कार्य करणे व समाजसेवेच्या माध्यमातून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे हाच मुख्य उद्देश राष्ट्रीय सेवा योजनेचा आहे. सर्व शिबिरार्थी स्वयंसेवकांना गावच्या सरपंच मा.कु.सुप्रियाताई मिसाळ व उपसरपंच मा.दत्तात्रय पा. नागरे, मा.प्रवीण मिसाळ, मा.प्रो.हेमलता राठोड यांनी शुभेच्छा दिल्या.

या शिबिर कालावधीत गावचे ग्राम स्वच्छता अभियान, वृक्षारोपण अभियान व जलसंधारण,श्री जन्माचे स्वागत व महिला सक्षमीकरण, शाश्वत व सर्वांगीण विकास, पर्यावरणपूरक पर्यटन, हुंडाबंदी जनजागृती, लोकशाहीतील सहभाग व मतदार जनजागृती, गावाचे सामाजिक ,आर्थिक व आरोग्यविषयक सर्वेक्षण, लोकसंख्या नियंत्रण व जनजागृती हे उपक्रम राबवले जाणार आहे व शिबिर कालावधीत विविध मान्यवरांचे व्याख्यानपर मार्गदर्शन आयोजित केले आहे.

गावातील सी. ए. परीक्षेत उत्तीर्ण झालेले विक्रम नागरे व महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेत यश संपादन केलेले वैभव मिसाळ , प्रा.प्रवीण मिसाळ यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळेस सहकार्यक्रम अधिकारी प्रा. पोपट खेमनर,प्रा.राजेंद्र लेंडे, प्रा.योगेश साळुंके, कला विभाग प्रमुख प्रा.कल्पना शेळके, अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक प्रा.गणेश कुलकर्णी, मराठी विभाग प्रमुख प्रा.दत्तात्रय आसवले, प्रा.जया रक्टे, प्रा.शबाना शेख, प्रा.स्वाती ढोकरे, प्रा.पूजा वलवे, प्रा.गणेश साळुंके, प्रा. शंकर राशिनकर, प्रा. संदिप खेमनर, प्रा.लक्ष्मण कातोरे ,प्रा. प्रियांका हाके, प्रा.स्वाती सागर ,प्रा.वृषाली शिरसाट, प्रा. हर्षदा हारदे सर्व प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राम विकास अधिकारी मा. विकास आहेर व प्रकाश मिसाळ यांचे अनमोल सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पोपटराव खेमनर यांनी केले. या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे सुत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक प्रा. म्हतू खेमनर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. विज्ञान विभाग प्रमुख प्रा.प्राजक्ता बिडवे यांनी मानले.

Leave a Comment