BREAKING! गॅस सिलिंडर महागला 

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी गॅस सिलिंडरचे दर वाढवले आहेत. ग्राहकांना एलपीजी गॅससाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

CNBC-TV18च्या वृत्तानुसार, ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 1 फेब्रुवारीपासून 19 किलोग्रमच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केलीय.

व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 14 रुपयांची वाढ करण्यात आलीय. या वाढीमुळे 19 किलोग्रॅमच्या कमिर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1755.5 रुपयांवरून 1769.50 रुपये प्रति सिलिंडर झालीय. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही.

Leave a Comment