स्व.आबांची शक्ती व आशिर्वादामुळेच बळ मिळाले – इंद्रजित खेमनर

साकूर वार्ताहर : स्व. अशोकराव खेमनर ( आबा) यांची गत पाच वर्षांपासून जयंती साजरी करत आहोत. पुर्वी परिस्थिती वेगळी होती कारण त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा आनंद वेगळा वाटायचा. पण २०१७ साली आबा सोडून गेले. परंतु स्व. आबांची शक्ती व आशिर्वादामुळे बळ मिळाल्यानेच राजकीय व कौटुंबिक वारसा चालू ठेवता आला. चांगलं कार्य केल्यानेच बळ मिळते अशी शिकवण आबांनी दिली. तसेच सर्व गोष्टींचे ज्ञानही दिले. स्व. आबांचे विचार पठारभागातील जनमानसात पोहचविण्यासाठी येत्या काळात भव्य जयंती साजरी करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन साकूर सोसायटीचे चेअरमन इंद्रजित खेमनर यांना केले.

ते साकूर येथील विद्या प्रबोधिनी प्रशालेत स्व. अशोकराव बाजीराव पा.खेमनर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर हे होते. तर व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते हनुमंत खेमनर, साकूर सोसायटीचे चेअरमन इंद्रजित खेमनर, लहानु खेमनर, महादू खेमनर, भाऊसाहेब सागर, विठु मैड, विजूभाऊ फिरोदिया, जयराम ढेरंगे, नामदेव खेमनर, अशोक हजारे, रमेश पेंडभाजे, चांगदेव खेमनर, महादू कुदनर आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी स्व. अशोकराव खेमनर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर मातोश्री हॉस्पिटलमध्ये डॉ. पवन खेमनर यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा शुभारंभ केला. यावेळी अनेक नागरिकांनी रक्तदान केले. तसेच रक्तदान करणाऱ्याला केशर आंब्याचे रोपटे देण्यात आले.

तत्पूर्वी विद्या प्रबोधिनी प्रशालेच्या वतीने गावातील महादेव मंदिर, शनि मंदिर, राम मंदिर, दत्त मंदिर, सावता महाराज मंदिर, संत गोरोबा मंदिर, संत नामदेव महाराज मंदिर, गणपती मंदिर, बिरोबा मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, मारूती मंदिरांसह तसेच चर्च, बौद्ध विहार, मस्जिद ( उर्दू शाळा) या धार्मिक स्थळांची साफसफाई केली.

तसेच साकूर परिसरातील जिल्हा परिषद शाळा साकूर, उर्दू शाळा साकूर, शासकीय आश्रमशाळा साकूर, जिल्हा परिषद शाळा देवी पठार, जिल्हा परिषद शाळा जोगेपठार, जिल्हा परिषद शाळा हळदा वस्ती, जिल्हा परिषद शाळा चितळकर वस्ती, जिल्हा परिषद शाळा चिंचेवाडी, जिल्हा परिषद शाळा हिरेवाडी, जिल्हा परिषद शाळा जांभुळवाडी, जिल्हा परिषद शाळा आनंदवाडी, जिल्हा परिषद शाळा तास्करवाडी, तसेच विद्या प्रबोधिनी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रविण मिसाळ यांनी केले तर आभार हेमचंद्र होळकर यांनी मानले.

यावेळी विद्या प्रबोधिनी प्रशालेचे प्राचार्या, मुख्याध्यापक, रजिस्ट्रार, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment