संगमनेर : तालुक्यातील साकूर येथील स्व. अशोकराव बाजीराव पा. खेमनर यांची आज जयंती असून विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. तसेच विद्या प्रबोधिनी प्रशालेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व साकूर सोसायटीचे चेअरमन इंद्रजित खेमनर यांच्यासह विविध मान्यवरांनी स्व. अशोकराव खेमनर यांना अभिवादन केले. तसेच जयंतीनिमित्त साकूर येथीलच कवि मनिषा भालके यांनी कवितेतून आबांच्या जीवनावरील सारांश मांडला आहे.
कविता पुढीलप्रमाणे
आबा पाटील – राजकारणातला सूर समाजकारणातला नूर
सत्याची कास
विकासाचा ध्यास!!
आबा पाटील – तरूणांची स्फूर्ती
तेजस्वी मूर्ती
शिक्षणाचा झरा
सुविचारांचा भारा
आबा पाटील – सडेतोड वक्तृत्व
आभाळाएवढे कर्तृत्व
प्रगतीचा वेध
कर्माचा अश्वमेध
आबा पाटील – धगधगता निखारा
दीनदलितांचा सहारा
विचारांचा आदर्श
विकासकामांचा परामर्श
आबा पाटील – व्यक्ती नव्हे तत्व
सद्वर्तनांचे सत्व
साधना निर्विकार
गावाचे शिल्पकार